रविंद्र चव्हाण यांनी घेतले शिवसेना मध्यवर्ती शाखेत जाऊन आशिर्वाद.!

सशक्त समाज न्यूज..✍️

रविंद्र चव्हाण यांनी घेतले छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे आशीर्वाद

डोंबिवली: भाजप पक्षाकडून सलग चौथ्यांदा डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून उमेद्वारी जाहीर झाल्यानंतर उमेद्वार रविंद्र चव्हाण यांनी सर्वप्रथम इंदिरा गांधी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर महायुतीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन करून आशीर्वाद घेतले.

रविंद्र चव्हाण हे जुन्या शिवसैनिकांप्रमाणे शिवसेना शाखेला मंदिर मानतात : राजेश मोरे मंदिर, घर, आणि रा.स्व.संघ कार्यालयाप्रमाणेच पवित्र स्थान मानणाऱ्या शिवसेना शाखेत जाताना नेहमीप्रमाणेच रविंद्र चव्हाण यांनी त्यांची पादत्राणे शाखेबाहेर काढून त्यानंतरच शाखेत गेले. त्यांच्या या नम्रता आणि शिस्तिची चर्चा शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांत रंगली होती, हे विशेष असल्याचे मत शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी व्यक्त केले. जुने शिवसैनिक अजूनही शाखेत जाताना त्यांचे चप्पल, बूट शाखेबाहेर काढून जातात अशा स्मृतीही काहींनी जागवल्या।

Leave a Reply

Discover more from सशक्त समाज न्यूज़

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading